घराला फॉल्स सिलिंग (False Ceiling) करणे खरंच गरजेचे आहे का? — जिप्सम बोर्ड की पारंपरिक पीओपी? एका घरगुती साईटचा डोळे उघडणारा अनुभव!
नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बाळसाहेब गरुड . इंटिरियर डिझाइन आणि सिव्हिलची कामे स्वतंत्रपणे सुरू केल्यानंतर माझ्या घरच्यांनी, नातेवाईकांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला कामे दिली; त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. आज असाच एक प्रसंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जो प्रत्येकाच्या घरच्या इंटिरियरशी थेट जोडलेला आहे. माझ्या आत्याच्या मुलीच्या (बहिणीच्या) २ बीएचके फ्लॅटचे काम काढायचे ठरले. त्यांनी तो फ्लॅट १० वर्षांपूर्वी घेतला होता. त्या वेळी त्यांनी किचनमध्ये फक्त एक बेसिक एसएस (SS) ट्रॉली बसवून घेतली होती. त्यानंतर १० वर्षे घरात काहीही नवीन केले नव्हते. आता घराचा लूक पूर्णपणे बदलायचा होता, पण विश्वासाचा माणूस सापडत नव्हता. मी कामे सुरू केल्याचे समजताच तिने मला थेट घरी बोलावले. आम्ही हॉल आणि बेडरूमच्या कामाची चर्चा सुरू केली. टीव्ही युनिट, सोफा, बेडरूममध्ये वॉर्डरोब आणि बेड या गोष्टी ठरल्या. पण जेव्हा विषय "फॉल्स सिलिंग" (False Ceiling) वर आला, तेव्हा ती एकदम थांबली आणि म्हणाली — "सौरभ, घरात इतर सर्व काम करू, पण छताला फॉल्स सिलिंग अजिबात नको!" लोकांच्य...