घराचा पाया आणि माती परीक्षण (Soil Testing) का महत्त्वाचे आहे? — पायऱ्या, पाषाण आणि एका मोठ्या साईटचा इंजिनिअरिंग अनुभव!
नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बाळसाहेब गरुड . कोणत्याही इमारतीचे आयुष्य हे तिच्या भिंतींवर किंवा रंगावर नाही, तर जमिनीच्या पोटातील पायावर (Foundation) अवलंबून असते. जर पाया मजबूत नसेल, तर कोट्यवधी रुपयांची इमारत एका बाजूला कलंडू शकते किंवा भिंतींना मोठ्या भेगा पडू शकतात. मी ज्या वेळी एका मोठ्या कन्स्ट्रक्शन साईटवर काम करत होतो, तेव्हाचा एक प्रसंग मला आजही आठवतो. त्या वेळी आमच्या पहिल्या बिल्डिंगचे फिनिशिंगचे काम सुरू होते — प्लास्टर, फ्लोअरिंग, पेंटिंग, किचन आणि लाईटिंगची अंतिम कामे चालू होती. त्याच वेळी दुसऱ्या टप्प्यात नवीन बिल्डिंगच्या कामाची सुरुवात होणार होती. आमच्या हेड ऑफ सिव्हिल डिपार्टमेंट (HOD) सरांनी मला नवीन जागेच्या माती परीक्षणासाठी (Soil Testing) पाठवले. जमिनीच्या खाली किती खोलीवर मजबूत खडक (हार्ड स्ट्राटा) लागतो आणि तिथली माती किती भार पेलू शकते, हे तपासणे ही कोणत्याही बांधकामाची पहिली पायरी असते. आज आपण याच माती परीक्षणाचे इंजिनिअरिंग वास्तव समजून घेऊया! १. माती परीक्षण (Soil Testing) कसे होते आणि लॅबमध्ये काय तपासले जाते? साईटवर बोरिंग मशीन आणून जमिनीतू...