मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

wardrobe design लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बेडरूम वॉर्डरोब: स्लाइडिंग डोअर की साधे उघडणारे शटर्स? — क्लायंटचा गोंधळ, ३ इंचांचे नुकसान आणि एका इंजिनिअरचा खरा सल्ला!

नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बाळसाहेब गरुड . नवीन घराचे इंटिरियर करताना किंवा बेडरूमचे कपाट (Wardrobe) डिझाइन करताना प्रत्येक घरात एक वाद हमखास ठरलेला असतो: "कपाटाला आधुनिक दिसणारे स्लाइडिंग डोअर (Sliding Doors) करायचे की साधे बिजागऱ्यांवर उघडणारे ओपनेबल शटर्स (Hinged Doors) ?" माझ्या एका साईटवर याच विषयावरून झालेला गोंधळ आजही माझ्या चांगलाच लक्षात आहे. क्लायंटच्या मनात सतत बदल होत होते: आधी म्हणाले — "आम्हाला ट्रेंडनुसार स्लाइडिंगच पाहिजे!" थोड्या दिवसांनी म्हणाले — "नाही नको, आपल्याला साधे उघडणारे दरवाजेच बरे पडतील." आणि स्ट्रक्चरल बॉक्स बनवून पूर्ण झाल्यावर परत विचार आला — "सौरभजी, एकदा परत विचार करा, स्लाइडिंगच करायचे का?" हा गोंधळ का होतो? कारण लोकांना स्लाइडिंगचा लक्झरी लूक हवा असतो, पण त्याच्या तांत्रिक मर्यादा माहीत नसतात. आज आपण एका इंजिनिअरच्या नजरेतून याच विषयाची पूर्ण चिरफाड करणार आहोत! १. कपाटाची अंतर्गत खोली (Depth) आणि ३ इंचांचे नुकसान! स्लाइडिंग डोअर निवडताना लोक सर्वात मोठी चूक कपाटाच्या अंतर्गत वापरायच्या जागेत ...