मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

modular kitchen लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मॉड्युलर किचनसाठी मरीन प्लाय की HDHMR? — एका प्रत्यक्ष साईटचा अनुभव आणि बजेट वाचवनारी माहिती!

नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बाळसाहेब गरुड . घर किंवा फ्लॅटचे इंटिरियर करताना प्रत्येक घरमालकाचा सर्वात जास्त वेळ, विचार आणि पैसा कुठे खर्च होत असेल, तर तो म्हणजे "मॉड्युलर किचन" (Modular Kitchen) वर! किचन हा घराचा असा भाग आहे जिथे पाणी, उष्णता, वाफ आणि तेलकटपणा या सर्वांचा रोज संबंध येतो. सध्या बाजारात एक नवीन ट्रेंड आणि प्रचंड मार्केटिंग सुरू आहे — "किचनमध्ये प्लायवूड नको, फक्त HDHMR च वापरा!" पण हे कितपत खरे आहे? आज मी तुम्हाला माझ्या एका क्लायंट मीटिंगचा आणि प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या साईटचा असा अनुभव सांगणार आहे, ज्यातून तुमचे हजारो रुपये वाचतील आणि किचनही वर्षानुवर्षे टिकेल. क्लायंटची मीटिंग आणि "फक्त HDHMR च लावा" हा हट्ट! काही दिवसांपूर्वी मला किचन इंटिरियरचे एक काम मिळाले. प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वी डिझाइन आणि मटेरियल फायनल करण्यासाठी मी क्लायंटच्या घरी मीटिंगसाठी गेलो. चर्चा सुरू होताच क्लायंटचे पहिले वाक्य होते: "सौरभजी, बाकी काहीही सांगा, पण आमच्या संपूर्ण किचनमध्ये फक्त HDHMR च वापरायचं आहे!" मी त्यांना शांतप...