मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

interior costing लेबलसह पोस्ट दाखवत आहे

फर्निचरसाठी लॅमिनेट (सनमायका): 0.8 mm की 1.0 mm? — ग्लॉस, मॅट की ॲक्रेलिक? एका इंटिरियर साईटचा डोळे उघडणारा अनुभव!

नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बाळसाहेब गरुड . इंटिरियर डिझाइनचा प्रत्यक्ष साईट अनुभव घेण्यासाठी मी सुरुवातीला जॉब करत होतो. जेव्हा मी जॉब सोडला आणि स्वतःची स्वतंत्र कामे घ्यायला सुरुवात केली, तेव्हा माझ्याकडे माझी पहिली स्वतंत्र इंटिरियरची साईट आली. त्या साईटवर काम सुरू झाल्यावर एक रंजक आणि डोळे उघडणारा प्रसंग घडला. आम्ही क्लायंटच्या बजेटनुसार सुरुवातीला कोटेशन ठरवले होते. पण जसजसे काम पुढे सरकले, तसे कॅटलॉगमधील डिझाइन्स पाहून क्लायंट अचानक म्हणाले — "सौरभजी, आपण ०.८ mm ऐवजी सगळीकडे १.० mm (1 mm) च लॅमिनेट वापरूया!" मी त्यांना समजावून सांगितले, "सर, १.० mm नक्कीच भारी आहे, पण कोटेशन ठरले असताना अचानक सगळीकडे १ mm वापरायचे ठरवले, तर बजेट थेट दुप्पट वाढेल!" त्यानंतर मी त्यांना ०.८ mm आणि १ mm मधील खरा फरक, मार्केटचे रेट्स आणि कुठे काय वापरावे याचा प्रॅक्टिकल ताळेबंद समजावून सांगितला. आज एका इंजिनिअरच्या नजरेतून याच विषयाचे खरे गणित आपण जाणून घेणार आहोत! १. 0.8 mm विरुद्ध 1.0 mm: दरांचे आणि बजेटचे वास्तव गणित सामान्य माणूस फक्त दुकानात जाऊन लॅमिनेटचा रंग क...